Posts

साहित्यिक शंभूराजे

Image
छ.संभाजी महाराजांची साहित्यिक ही ओळख लोप होताना दिसत आहे. शिवपुत्र संभाजी राजे हे लढाऊ होते पण त्याचबरोबर साहित्यिक देखील होते हा गुण त्यांचा आज विसरला जात आहे. आठ भाषांवर त्यांच प्रभुत्व होत त्यामुळे त्यांच ज्ञान हे दर्जेदार होत. छ. शिवाजी महाराज स्वर्गवासी झाल्यास हिंदवी स्वराज्याला खीळ बसली.अधिकारी लोक आपली मनमानी करू लागले.स्वराज्याचा गाडा ढासळत चाला होता. त्यावेळेस छ. संभाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्याला सावरल होते.स्वराज्यातील कित्येक लोकांचा विरोध पत्करून स्वराज्य पुर्वस्थितीतीवर आणलं. छ. शिवाजी महाराज इच्छित होते ते स्वराज्य पुन्हा उभारल. पण हा धोका भविष्यात ही उद्धभवु शकतो हे त्यांनी ओळखल होते म्हणुन त्यांनी स्वराज्यासाठी लिखित कायदे लिहिले, भारतातील पाहिले संविधान छ. संभाजी महाराजांनी लिहुन ठेवले.आणि या कायद्यात समानता ही सर्वात महत्वाची बाब ठेवली.हिंदवी स्वराज्यात प्रत्येकास स्वातंत्र्य व समानता असावी हे लिहुन ठेवल. समाज व्यवस्थेवर त्यांचा इतका दांडगा अभ्यास होता की चौदाव्या वर्षी त्यांनी समाज व्यवस्थेवर आधारित व राज्य कस चालवाव हे सांगण्यासाठी बुधभूषण हा ग्रंथ ल

आध्यात्मिक मार्गातुन सामाजीक कार्य

Image
भैय्युजी महाराजांनी आत्महत्या केली त्यानंतर त्यांच्याविषयी नकारात्मक पोस्ट सोशल मीडिया वर फिरू लागल्या. एखाद्या व्यक्तीविषयी संपुर्ण माहिती न घेता आपण त्याच्या परिस्थितीनुसार त्याला दोष देतो. ही मानवी जीवनातील सर्वात घाणेरडी सवय जी आपणास मोडीत काढली पाहिजे. मी भैय्युजी महाराजांचा समर्थक किंवा विरोधक नाही.  फक्त माणसाने परिस्थितीच्या विरोधात पाऊल उचलले की आपण त्यांना दोष देण्यास सुरुवात करतो. ह्या विचारांच्या विरोधात मात्र मी नक्की आहे. भैय्युजी महाराज आध्यत्मिक गुरू किंवा संत होते का ? याची माहिती आपल्या समोर मला मांडता येणार नाही. पण भैय्युजी महाराजांच्या सामाजिक कामाचा लेखाजोखा मात्र आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करील. राजकारणातील मोठमोठ्या नेत्यांसोबत दिसणारे भैय्युजी महाराज शेतकऱ्यांना मोफत बी-बियाणे वाटप करून शेतकऱ्यांना आत्महत्येपासुन परावर्तित करत होते. हे ठोस पाऊल सरकारला देखील उचलता आले नाही. ते भैय्युजी महाराजांनी करून दाखिवले. भैय्युजी महाराजांनी 46 व्या वर्षी लग्न केले म्हणुन त्यांची टिंगल उडवण्यात आली. त्यांनी मात्र 51 वैश्याच्या मुलांना स्वतःच नाव देऊन त्यांच पालकत्

पवार, पॉवर आणि पॉलिटिक्स

Image
सोनिया गांधी यांनी दिल्लीत प्रीती भोजनाचा कार्यक्रम घेतला. यात शरद पवार सक्रिय दिसले. लगेच दुसऱ्या दिवशी राहुल गांधी यांनी शरद पवारांची भेट घेतली. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले. सोनिया गांधी यांनी शरद पवारांना काँग्रेसची ऑफर दिली. अश्या बातम्या प्रसारमाध्यमावर प्रसारित व्हायला सुरुवात झाली. सोनिया गांधी यांनी शरद पवारांना कोणती ऑफर दिली ? काँग्रेसची की पंतप्रधानपदाची ? शरद पवार आपली राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी काँग्रेसमध्ये विलीन करतील हे तर काही शक्य नाही. 1999 ते 2014 पर्यंत सत्तेत राहिलेला पक्ष कोण स्वतः संपवेल. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत शरद पवारांची एकाधिकारशाही आहे. म्हणुन पवार काँग्रेस मध्ये जाणे ही फक्त बातमीच राहील यात काही तथ्य नाही. मात्र शरद पवारांना पंतप्रधानपदाची ऑफर दिली जाईल का ? ही बातमी महत्त्वाची आहे. ही बातमी सत्यात उतरू शकेल. कारण मोदी, शाह या झंझावाताला थांबवण्यासाठी त्यांच्या तोडीचाच चाणक्य लागेल. हे आता सर्वांना कळुन चुकले. सोनिया गांधी यांनी 20 पक्षांना एकत्र आण्याचे काम केले. या 20 पक्षांना बांधुन ठेवणाऱ्या नेत्याची गरज आता आहे.  राहुल गा

इच्छाशक्तीचा सम्राट

Image
"स्टीफन हॉकिंग" संपुर्ण जगाला ज्ञात असलेले नाव, त्यांच्या सिद्धांताचा गंध नसलेल्या सुद्धा हे नाव ओळखीचे वाटते....जगाने शास्त्रज्ञाच्या पलीकडे स्टीफन हॉकिंगडे पाहिले. हे भाग्य फार कमी जनांच्या नशिबाला येते. वैज्ञानिक गॅलिलिओ यांच्या 300व्या पुण्यतीथीदिनी स्टीफन हॉकिंग यांचा जन्म झाला व आईन्स्टाइन यांच्या जन्मदिवशी स्टीफन हॉकिंग यांचा मृत्यु झाला. हा योगायोगच म्हणावे लागेल कारण ज्याने आपल्या ह्यातीत दैववाद नाकारला त्याच्या माथी चमत्कार मारणे म्हणजे त्याचा अपमानच करणे. गॅलिलिओ,आईन्स्टाइन,स्टीफन हॉकिंग ह्यांच्यात काही साम्य आहेत. तिघांची बौद्धीकक्षमता अफाट, का ? हा प्रश्न तिघांना आयुष्यभर पडला, दैववाद तिघांनी नाकारला, (ज्यांनी-ज्यांनी दैववाद मानला त्यांना का ? हा प्रश्न पडत नाही कारण एकदा का दैववाद मानला की सृष्टीतील गुढांचे उत्तर दैव हेच येते.) तिघातही प्रबळ इच्छाशक्ती होती पण स्टीफन हॉकिंग यांच्यात थोडी जास्तच होती.  स्टीफन हॉकिंग यांना वयाच्या एकविसाव्या वर्षी मोटर न्युरॉन या रोगाने ग्रासले या रोगात रोगीच्या शरीरातील अवयव हळूहळू निकामी होत जातात. व शेवटी रोगीचा मृत्यू होत

विजयाचा शिल्पकार

Image
त्रिपुरा विधानसभेचा आज निकाल आला आणि त्याने सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला. 2017 पर्यंत त्रिपुरा या राज्यात भारतीय जनता पार्टीचा एकही कार्यकर्ता नव्हता आज तिथेच 43 जागा मिळवुन पक्षाचा मुख्यमंत्री होतो, खरच ही गोष्ट आचंबीत करणारी आहे. ज्या पक्षाला राज्यातील प्रदेशाध्यक्ष पद बदलण्याचे महत्त्व वाटत नव्हते त्या राज्यात एवढे घवघवीत यश आज पक्षाने मिळवले. ही निवडणूक जिंकण्यासाठी भाजपच्या अनेक नेत्यांनी मेहनत घेतली. कोणताही चेहरा समोर न ठेवता भाजपाने ही निवडणुक लढवली. या विजयामाग मात्र एका व्यक्तीचा मोलाचा वाटा आहे आणि तो म्हणजे विप्लव कुमार देव यांचा... हे नाव आपल्यासर्वांसाठी नवखे आहे त्यापेक्षा 2016 आधी त्रिपुरा राज्यालासुद्धा हे नाव नवेच होते. भारतीय जनता पार्टीचे त्रिपुरा राज्यातील पाहिले मुख्यमंत्री म्हणुन विप्लव देव यांना संधी देण्यात येईल अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. बनमालिपुर विधानसभा मतदारसंघातून त्यांनी निवडणुक लढवली आहे. विप्लव देव हे कोण्या राजकीय घराण्याशी संबंधित नाहीत किंवा 2016 आधी ते राजकारणात सक्रिय देखील नव्हते. त्यांचे त्रिपुरा राज्यात देखील जास्त वास्तव नाही. त्

विरोधकांचा अज्ञाज्ञी विरोध

Image
पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी आपुल्या घरीच हाल सोसते मराठी हे असे कितीक खेळ पाहते मराठी शेवटी मदांध तख्त फोडते मराठी ही चार वाक्य मराठी भाषा दिनी चर्चित आली...याच कारण म्हणजे मराठी भाषा दिनी विधिमंडळाच्या आवारात सामुहिक मराठी अभिमाणगीत (लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी) गायनाचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमात मराठी अभिमान गीतातील ह्या चार ओळी गाळण्यात आल्या. यावरुन विरोधकांनी सभागृहात सरकारवर आक्षेप घेत गोंधळ घातला. सरकारनेही माईक खराब झाला सांगत सारवासारव केली. आता मराठी अभिमानगीतात या ओळी न घेण्याचं कारण समजावून घेण्याकरता या कवितेचा इतिहास तपासणं आवश्यक आहे. सुरेश भटांनी ही कविता संयुक्त महाराष्ट्र लढ्यादरम्यान लिहिली त्यावेळी त्यांनी ह्या ओळी त्यात लिहिल्या नाहीत. पुढे ही कविता रुपगंधा या त्यांच्या संग्रहात प्रसिद्ध झाली. या संग्रहात देखील शेवटच्या चार ओळी टाकल्या नाहीत. 1980 दरम्यान बाळासाहेब ठाकरेंच्या सभेत सुरेश भटांनी ही कविता सादर केली व ह्या चार ओळी शेवटी त्यात जोडल्या पण त्यांनी ह्या ओळी रुपगंधा संग्रहातील पुढील आवृत्तीत टाकल्या नाहीत. आज जरी आपण हा संग्रह उघडुन पाहि

सदमा

Image
श्रीदेवी यांना " अभिनयाची देवी" हे नाव उत्तमरीत्या शोभल असते. आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना वेड लावुन सरतेशेवटी बॉलीवूडच्या देवी ठरल्या.... दक्षिण भारतातील काशी म्हणुन ओळखलं जाणाऱ्या शिवकाशी येथे 1963 साली श्रीदेवींचा जन्म झाला. वयाच्या 4 थ्या वर्षांपासून श्रीदेवींनी चित्रपटात बाल कलाकार म्हणुन काम सुरू केले.  मल्याळम, तेलगु, तामिळ, हिंदी अशा विविध भाषेतील 300 चित्रपटात काम करण्याचं भाग्य श्रीदेवींना लाभलं. भाग्यापेक्षा त्यांच्यात असलेल्या उत्तम कलाकाराने त्यांना एवढ्या मोठ्या उंचीवर नेल. 1979 साली सोलावा सावन चित्रपटातुन बॉलीवूड मध्ये पदार्पण केले. सौंदर्याची खान, उत्तम अभिनय व 80 च्या दशकात कोणी विचारही केला नसेल अस नृत्य ह्या श्रीदेवींच्या भक्कम बाजु त्यामुळे त्या बॉलीवूडच्या पहिल्या महिला सुपरस्टार झाल्या. हिंदी भाषेवर पक्कड नसल्या मुळे सुरुवातीला हिंदी चित्रपटात त्यांचा आवाज नाज ह्या डब करत असे. आखरी रास्ता या चित्रपटात तर रेखा यांनी त्यांना आवाज दिला. हिंदी भाषा बोलता न येणे ही त्यांची ऋणात्मक बाजु करीयर मध्ये आडवी आली असती पण त्यांनी हिंदी भाषा शिकुन चांदनी ह्य