आध्यात्मिक मार्गातुन सामाजीक कार्य
भैय्युजी महाराजांनी आत्महत्या केली त्यानंतर त्यांच्याविषयी नकारात्मक पोस्ट सोशल मीडिया वर फिरू लागल्या. एखाद्या व्यक्तीविषयी संपुर्ण माहिती न घेता आपण त्याच्या परिस्थितीनुसार त्याला दोष देतो. ही मानवी जीवनातील सर्वात घाणेरडी सवय जी आपणास मोडीत काढली पाहिजे. मी भैय्युजी महाराजांचा समर्थक किंवा विरोधक नाही. फक्त माणसाने परिस्थितीच्या विरोधात पाऊल उचलले की आपण त्यांना दोष देण्यास सुरुवात करतो. ह्या विचारांच्या विरोधात मात्र मी नक्की आहे. भैय्युजी महाराज आध्यत्मिक गुरू किंवा संत होते का ? याची माहिती आपल्या समोर मला मांडता येणार नाही. पण भैय्युजी महाराजांच्या सामाजिक कामाचा लेखाजोखा मात्र आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करील. राजकारणातील मोठमोठ्या नेत्यांसोबत दिसणारे भैय्युजी महाराज शेतकऱ्यांना मोफत बी-बियाणे वाटप करून शेतकऱ्यांना आत्महत्येपासुन परावर्तित करत होते. हे ठोस पाऊल सरकारला देखील उचलता आले नाही. ते भैय्युजी महाराजांनी करून दाखिवले. भैय्युजी महाराजांनी 46 व्या वर्षी लग्न केले म्हणुन त्यांची टिंगल उडवण्यात आली. त्यांनी मात्र 51 वैश्याच्या मुलांना स्वतःच नाव देऊन त्यांच पा...