Posts

Showing posts from January, 2018

श्रीशंभुराज्यभिषेक

Image
श्रीशंभुराज्याभिषेक घडामोडी शके १६०२ रौद्र संवत्सरे श्रावण शुद्ध पंचमी (नागपंचमी) म्हणजेच २० जुलै १६८० रोजी संभाजी महाराजांचे मंचकारोहण झाले आणि त्यांनी स्वतःला “राजा” झाल्याचे घोषित केले. यासंदर्भात डाग रजिस्टर मध्ये २४ ऑगस्ट १६८० ची नोंद आहे – “जुन-जुलै शिवाजीराजा मरून संभाजीला त्याचे सिंहासन मिळाले असावे असे सर्वत्र बोलले जाते. आपल्या बापाच्या तत्त्वांप्रमाणे संभाजी वागणारा आहे असे लोक म्हणतात.” संभाजी महाराजांचा कारभार रायगडावरुन सुरळीत सुरु झाला. त्यांनी आगळीक करणाऱ्या सर्व मंत्र्यांना माफ करुन पुन्हा त्यांच्या पदावर पुन्हा नियुक्त केले. मोरोपंत पिंगळेंच्या निधनानंतर त्यांच्या पुत्राला पेशवाई दिली गेली. श्रीशंभुराज्याभिषेक सोहळा थोरल्या महाराजांच्या मृत्युनंतरच्या अस्थिर वातावरणात झालेल्या मंचकरोहणात शंभुराजे व त्यांच्या सहकारी मंत्र्याधिकाऱ्यांना त्यातुन तितके समाधान व शास्त्रार्थाच्या दृष्टीने निर्दोषत्व वाटले नाही. त्यामुळे शंभुराजांवर विधियुक्त राज्याभिषेक करवुन राजसिंहासानाची प्रतिष्ठा राखावी असा विचार झाला. त्यानुसार शंभुराजांनी आपला राज्याभिषेक करण्याचा निर्णय घेतला.

राहुल पर्व

Image
राहुल गांधी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षपदी विराजमान होणार हे निश्चित झाले. तेव्हा पासुन राहुल गांधी यांच्यावर वंशवादाचा आरोप करायला विरोधक समोर आले. आपल्या वंशालाच समोर पाठवणे हे चुक की बरोबर ?  हा मुद्दा घेतला तर वंशवाद चुकीचाच राहील हे माझं व्यक्तीक मत आहे. पण राहुल गांधी यांच्यावर वंशवादाचा आरोप करने हे चुकीचे आहे. कारण सध्याची काँग्रेसची आणि देशाची परिस्थिती वेगळी आहे. जेव्हा सोनिया गांधी काँग्रेसच्या अध्यक्षपदी आणि राहुल गांधी उपाध्यक्षपदी होते. तेव्हा काँग्रेसची केंद्रात आणि जवळजवळ सर्व राज्यात सत्ता होती. तेव्हा सत्ता चालवण्याच श्रेय देण्यात आलं ते मनमोहन सिंग, चिदंबरम   किंवा कॉंग्रेसच्या मंत्रीमंडळाला तेव्हा राहुल गांधी यांना का श्रेय दिले गेले नाही. 2014 च्या लोकसभेत काँग्रेस पूर्णपणे पराजीत झाले, जवळजवळ सर्व घटक राज्यांतुन काँग्रेसची सत्ता गेली. तेव्हा त्या पराजयाच खापर मात्र राहुल गांधी यांच्यावर फोडण्यात आले. सामान्य माणुस असो किंवा मीडिया प्रत्येकाने वरील काम चोख पार पडले. जेव्हा काँग्रेसवर एवढी चिंताजनक परिस्थिती आली तेव्हा काँग्रेस मधुन कोणी नेतृत्व करण्य

हत्या की बलिदान ?

Image
इंदिरा गांधी यांची हत्या झाल्यानंतर भारताचा सुरक्षाविषयक दृष्टिकोन जगासमोर आला. पंतप्रधान या पदावरील व्यक्ती देशाचा सर्वेसेवा असतो. एखाद्या देशाच्या पंतप्रधानाची हत्या सहज करता येते त्या देशात सामान्य नागरिकाच्या हत्येच काय आले... 1984 ला इंदिरा गांधी यांची हत्या झाल्यानंतर देशातील सुरक्षा संस्थाना आपली स्थिती लक्षात आली... पण काही जणांनी आपल्या अंगावरील धुळ फेकण्यासाठी टाहो फोडला की इंदिरा गांधी यांची हत्या त्यांच्या अंगरक्षकाने केली म्हणून सहज करण्यात आली नाहीतर बाहेरील व्यक्तीला शक्य झाले नसते...पण ह्या गोष्टीत काही तथ्य नाही कारण त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी दिल्ली पोलिस यांच्यावर होती आणि भारतातील पोलिस प्रशासनाची स्थिती सांगायची गरज नाही. काही भारतीयांनी व्यापक दृष्टिकोन ठेवला व भारतातील सुरक्षा व्यवस्था बदलन्यासाठी पाऊले उचलली. त्यातुनच 1986 मध्ये राष्ट्रीय सुरक्षा गार्ड (NSG) आणि 1988 विशेष सुरक्षा दल (SPG) ह्या दोन संस्था स्थापन करण्यात आल्या. म्हजेच भारतात सुधारणा घडवण्यासाठी पंतप्रधानांना आपला जीव गमवावा लागला..इंदिरा गांधी यांची हत्या झाल्यापासून पंतप्रधानांच्या सुरक्

कृष्णाकांठ की लोक माझे सांगती

Image
कृष्णाकांठ यशवंतराव चव्हाण यांना दिल्लीवरून बोलवण आलं...तेव्हा महाराष्ट्रातील लोकांनी दिल्लीच्या मदतीला सह्याद्री धावुन गेला अशी गर्जना केली…..यशवंतरावांसारख्या सात्विक माणसाची किंमत दिल्लीला कुठे होती. दिल्लीतील मंडळींनी यशवंतरावांना योग्य तो न्याय दिला नाही. फक्त स्वतःच्या स्वार्थाकरिता यशवंतरावांचा उपयोग करून घेतला. "गरजेपुरते यशवंतराव" ही दिल्लीकरांची समज होती. संरक्षण मंत्री ते गृह मंत्री पुन्हा अर्थ मंत्री पुन्हा पराष्ट्र मंत्री व शेवटी फक्त नियोजन आयोगाचे अध्यक्ष असा अपमानीत प्रवास केवळ यशवंतरावांचाच असेल....!! जेव्हा शास्त्रीजींचे निधन झाले तेव्हा पंतप्रधान होण्याची इच्छा यशवंतरावांची होती..आणि तेवढी त्यांची क्षमता होती आणि त्यांना तेवढा पाठिंबा सुद्धा राहिला असता.... केवळ पंडीत नेहरूंच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी त्यांनी इंदिराजींना पाठिंबा दिला. इंदिराजींनी मात्र यशवंतरावांच्या ऋणाची जाण ठेवुन योग्य न्याय दिला अस मला वाटत नाही...!! ह्या दिल्लीची एक सवय आहे...हे जेव्हा अडचणीत असतील तेव्हाच हे दिल्लीचे दारे महाराष्ट्रासाठी उघडी करतात आणि स्वार्थ साधुन घेतला की पुन