राहुल पर्व

राहुल गांधी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षपदी विराजमान होणार हे निश्चित झाले. तेव्हा पासुन राहुल गांधी यांच्यावर वंशवादाचा आरोप करायला विरोधक समोर आले.
आपल्या वंशालाच समोर पाठवणे हे चुक की बरोबर ?  हा मुद्दा घेतला तर वंशवाद चुकीचाच राहील हे माझं व्यक्तीक मत आहे.
पण राहुल गांधी यांच्यावर वंशवादाचा आरोप करने हे चुकीचे आहे. कारण सध्याची काँग्रेसची आणि देशाची परिस्थिती वेगळी आहे.
जेव्हा सोनिया गांधी काँग्रेसच्या अध्यक्षपदी आणि राहुल गांधी उपाध्यक्षपदी होते. तेव्हा काँग्रेसची केंद्रात आणि जवळजवळ सर्व राज्यात सत्ता होती. तेव्हा सत्ता चालवण्याच श्रेय देण्यात आलं ते मनमोहन सिंग, चिदंबरम  किंवा कॉंग्रेसच्या मंत्रीमंडळाला तेव्हा राहुल गांधी यांना का श्रेय दिले गेले नाही.
2014 च्या लोकसभेत काँग्रेस पूर्णपणे पराजीत झाले, जवळजवळ सर्व घटक राज्यांतुन काँग्रेसची सत्ता गेली. तेव्हा त्या पराजयाच खापर मात्र राहुल गांधी यांच्यावर फोडण्यात आले. सामान्य माणुस असो किंवा मीडिया प्रत्येकाने वरील काम चोख पार पडले.
जेव्हा काँग्रेसवर एवढी चिंताजनक परिस्थिती आली तेव्हा काँग्रेस मधुन कोणी नेतृत्व करण्यासाठी समोर सरसावले नाही. राहुल गांधी यांनीच हा पराजय मान्य केला आणि तेच स्वतः समोर सरसावले.
2014 च्या आधी राहुल गांधी यांच व्यक्तिमत्व कस होत आणि काल गुजरात विधानसभा निवडणुकीत ते कोणत्या रूपात समोर आले हे खरच आश्चर्यकारक आहे. स्वतः मध्ये एवढा मोठा आमुलाग्र बदल करून मतदारांच्या समोर येणे खरच खुप कौतुकास्पद आहे.
काहीजण अशीही टीका करतात की गांधी परिवाराने स्वतःच्या परिवारातील सदस्या व्यक्तिरिक्त इतर दुसऱ्या नेतृत्त्वाला संधी दिलीच नाही.
संधी मात्र परमेश्वर सुद्धा देत नसतो. संधी देत असते ती परिस्थिती. ज्यावेळेस आपल्या बाजूची परिस्थिती स्वतः साठी अनुकुल असते त्यालाच संधी म्हणतात आणि ते कोणी देण्याचा किंवा न देण्याचा प्रश्न नसतो.
नरेंद्र मोदी यांना संधी दिली का भेटली ह्या मुद्द्यावरूनच सर्व प्रश्नांचा उलगडा होईल. नरेंद्र मोदी यांना देखील पंतप्रधान पदाची संधी भेटली त्यांना ती कोणी दिली नाही. 2014 लोकसभा निवडणुक लढवण्यासाठी भाजपा जवळ निवडणूक लढवण्याचा मुद्दा नव्हता तो त्यांनी मोदी यांना पंतप्रधान घोषित करून मिळवला. आणि मोदी यांच्या तोडीचा उमेदवार भाजपात दुसरा कोणी नव्हता मग ही परिस्थिती नरेंद्र मोदी यांच्या साठी अनुकूल होती आणि त्यांनी ह्या संधीच सोन केलं.
2014 लोकसभा अपयशानंतर काँग्रेस मधुन समोर येण्याची कार्यकर्त्यापासून नेत्यापर्यंत प्रत्येकाला सुवर्ण संधी होती. कारण तेव्हा राहुल गांधी एवढे सक्रिय नव्हते आणि त्यांची प्रतिमा देखील तेवढी सक्षम नव्हती. राहुल गांधी यांच्या वक्तव्याला देखील कोणी साद देत नव्हते.
आज जर त्यांनी केंद्रातील सरकार वर टीका केली तर भाजप मधील 5-6 नेते टीकेला प्रतिउत्तर देण्यासाठी पुढे सरसावत आहेत. नरेंद्र मोदी हे देखील सत्तेत आल्यापासून  राहुल गांधी यांचे नाव घेऊन टीका करणे टाळत असत मात्र गुजरात विधानसभा प्रचारात त्यांना राहुल गांधी यांचे नाव घेऊन टीका करावी लागली. यातूनच सर्व काही समजते.
मात्र मुद्दा हा होता की 2014 च्या लोकसभेच्या पराभवानंतर काँग्रेस मधुन राहुल गांधी व्यतिरिक्त दुसरं कोणीच समोर का आले नाही.
कारण कोणाची तेवढी क्षमता नसेल आणि क्षमता असली तरी कोणी तेवढे धाडस केले नाही. काँग्रेस मधील नेत्यांनी देखील राहुल गांधी यांच्यावर टीका करूनच वेळ वाया घालवला.
शेवटी नेतृत्त्व घ्यावे लागले ते राहुल गांधी यांनाच, नियतीला देखील हेच मान्य असेल.
इंदिरा गांधी यांना सुरुवातीस गुंगी गुडीया म्हणूनच हीनवल्या गेले. पन काळानुरूप त्यांच्या कार्याने विरोधकाला देखील दुर्गा म्हणून त्यांचा गौरव करावा लागला.
तशीच परिस्थिती आज राहुल गांधी यांच्यावर आली. आणि ते त्यात उत्तीर्ण झाले.
जगात आज प्रत्येक क्षेत्रात वंशवाद आहे त्याचे उदाहरण देने टाळतोय पण आपल्याला ते मान्य करावेच लागेल.

जाता-जाता राहुल गांधी यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा..!!!
राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसला निश्चितच अच्छे दिन येतील..!!!

Comments

Popular posts from this blog

सदमा

विजयाचा शिल्पकार

इच्छाशक्तीचा सम्राट