विजयाचा शिल्पकार

त्रिपुरा विधानसभेचा आज निकाल आला आणि त्याने सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला. 2017 पर्यंत त्रिपुरा या राज्यात भारतीय जनता पार्टीचा एकही कार्यकर्ता नव्हता आज तिथेच 43 जागा मिळवुन पक्षाचा मुख्यमंत्री होतो, खरच ही गोष्ट आचंबीत करणारी आहे. ज्या पक्षाला राज्यातील प्रदेशाध्यक्ष पद बदलण्याचे महत्त्व वाटत नव्हते त्या राज्यात एवढे घवघवीत यश आज पक्षाने मिळवले.
ही निवडणूक जिंकण्यासाठी भाजपच्या अनेक नेत्यांनी मेहनत घेतली. कोणताही चेहरा समोर न ठेवता भाजपाने ही निवडणुक लढवली.
या विजयामाग मात्र एका व्यक्तीचा मोलाचा वाटा आहे आणि तो म्हणजे विप्लव कुमार देव यांचा...
हे नाव आपल्यासर्वांसाठी नवखे आहे त्यापेक्षा 2016 आधी त्रिपुरा राज्यालासुद्धा हे नाव नवेच होते.
भारतीय जनता पार्टीचे त्रिपुरा राज्यातील पाहिले मुख्यमंत्री म्हणुन विप्लव देव यांना संधी देण्यात येईल अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. बनमालिपुर विधानसभा मतदारसंघातून त्यांनी निवडणुक लढवली आहे.
विप्लव देव हे कोण्या राजकीय घराण्याशी संबंधित नाहीत किंवा 2016 आधी ते राजकारणात सक्रिय देखील नव्हते.
त्यांचे त्रिपुरा राज्यात देखील जास्त वास्तव नाही. त्यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण मात्र त्रिपुरातच झाले.
त्यांनी त्यांच्या जीवनाचा अधिक काळ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यात दिला. त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्य कार्यालयात म्हणजेच नागपुर मध्ये देखील काम केले.
15 वर्षांपूर्वी शिक्षणासाठी ते दिल्लीत आले सोबत तिथेच संघाचे कार्य करू लागले. सोबतच उदरनिर्वाहनासाठी जिममध्ये जिम इन्स्ट्रक्टर म्हणून आजपर्यंत काम करत होते. त्यांच्या पत्नी SBI बँकेत डेप्युटी मॅनेजर म्हणुन कार्यरत आहेत.
यात विशेष बाब म्हणजे त्यांनी त्रिपुरातील राजकारण जवळुन कधीच पाहिलं नाही.
हिंदुत्ववादी विचारसारणीसाठी भाजप सरकारवर सगळ्यात जास्त आरोप होतात.आज त्रिपुरा राज्यातील नागरिक विप्लव देव यांच्या नावासाठी आग्रही आहे. यात विशेष असे की त्रिपुरा विधानसभेत 20 जागा आदिवासी व 10 जागा दलित समाजासाठी राखीव आहेत.
ज्यावेळी विप्लव देव पक्षात आले तेव्हा त्यांनी अमित शहा यांनी सुरू केलेल्या ऑनलाइन पद्धतीने भाजप कार्यकर्ता जोडणी मोहीमेतील शक्य तितक्या कार्यकर्त्यांना भेटण्याचे कार्य हाती घेतले. त्यात त्रिपुरा राज्यातील 2 लाख नागरिकांनी नोंदणी केली होती.
सुरुवातीस त्यांनी कुठल्याच इतर पक्षातील नेत्यास भाजप मध्ये वळवण्याचे कार्य केले नाही. पाहिले इतर पक्षातील कार्यकर्ते भाजपात घेण्यास सुरुवात केली नंतर स्थानिक स्वराज्य संस्थेतील इतर पक्षातील नेते भाजपात वळवले...
त्रिपुरा विधानसभेचा खालच्या पातळीपासुन अभ्यास करण्यासाठी त्यांना फार कमी वेळ मिळाला असावा असा माझा अंदाज आहे. आधीचा त्यांचा किती अभ्यास होता यावरच वरील अंदाज जास्त प्रभावी लागू होईल.
नरेंद्र मोदी यांच्या 5, योगी आदित्यनाथ यांच्या 7 आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या रॅली यशस्वी करण्यासाठी त्यांनी पडद्यामागून महत्त्वाची भूमिका साकारली होती. 
विप्लव देव हे कमी बोलतात व वक्तृत्वावर देखील त्यांची जास्त पक्कड नाही पण स्पष्टवक्तेपणाबद्दल ते जास्त प्रसिद्ध आहेत तसेच त्यांच्याविरोधात एकाही गुन्ह्याची नोंद नाही. निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांची एकूण संपत्ती २ लाख ९९ हजार २९० रुपये एवढी आहे.भाजपाचे ईशान्य भारत विभागाचे प्रमुख सुनील देवधर यांना मागच्या दोन ते तीन वर्षांपासून पक्ष बळकट करण्यासाठी विप्लव देव यांनी सर्वात जास्त सहाय्य केले.
विप्लव देव सारखे कार्यकर्ते प्रत्येक राजकीय पक्षाला लाभावे कारण असल्या कार्यकर्त्यांना पदाचा मोह कधीच नसतो. यांसाठी कार्यकर्ता हेच पद अतिमहत्ववाचे असते.
विप्लव देव हे राजकीय जीवनात अति उंचीवर जावो ही ईश्वरचरणी प्रार्थना.....
                        - रजत देशमुख

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

इच्छाशक्तीचा सम्राट

साहित्यिक शंभूराजे

सदमा