आध्यात्मिक मार्गातुन सामाजीक कार्य

भैय्युजी महाराजांनी आत्महत्या केली त्यानंतर त्यांच्याविषयी नकारात्मक पोस्ट सोशल मीडिया वर फिरू लागल्या. एखाद्या व्यक्तीविषयी संपुर्ण माहिती न घेता आपण त्याच्या परिस्थितीनुसार त्याला दोष देतो. ही मानवी जीवनातील सर्वात घाणेरडी सवय जी आपणास मोडीत काढली पाहिजे.
मी भैय्युजी महाराजांचा समर्थक किंवा विरोधक नाही.  फक्त माणसाने परिस्थितीच्या विरोधात पाऊल उचलले की आपण त्यांना दोष देण्यास सुरुवात करतो. ह्या विचारांच्या विरोधात मात्र मी नक्की आहे.
भैय्युजी महाराज आध्यत्मिक गुरू किंवा संत होते का ? याची माहिती आपल्या समोर मला मांडता येणार नाही.
पण भैय्युजी महाराजांच्या सामाजिक कामाचा लेखाजोखा मात्र आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करील.
राजकारणातील मोठमोठ्या नेत्यांसोबत दिसणारे भैय्युजी महाराज शेतकऱ्यांना मोफत बी-बियाणे वाटप करून शेतकऱ्यांना आत्महत्येपासुन परावर्तित करत होते. हे ठोस पाऊल सरकारला देखील उचलता आले नाही. ते भैय्युजी महाराजांनी करून दाखिवले.
भैय्युजी महाराजांनी 46 व्या वर्षी लग्न केले म्हणुन त्यांची टिंगल उडवण्यात आली. त्यांनी मात्र 51 वैश्याच्या मुलांना स्वतःच नाव देऊन त्यांच पालकत्व स्वीकारलं, ही माहिती यातील किती जणांना होती ? हा महत्त्वाचा प्रश्न आहे.
शेतकऱ्यांविषयी तर ते फार हळवे व्हायचे, ज्यावेळेस मोदी सरकारने भुमी अधिग्रहन कायदा आणला त्याच्या विरोधातील पाहिले पत्र भैय्युजी महाराजांनी पाठवले.
बुलढाणा जिल्ह्यात 700 आदिवासी विद्यार्थ्यांसाठी निवासी शाळा उभारण्याच काम भैय्युजी महाराजांनी केले.
अध्यात्मिक मार्गावर असुन सुद्धा त्यांनी कोणत्याही जातीला किंवा धर्माला विरोध केला नाही. कर्मठ हिंदुत्वाच्या विरोधात त्यांनी नेहमीच काम केलेे. याच कारणामुळे त्यांच्यावर दोनदा जीवघेणा हल्ला सुद्धा झाला. त्यांची या विचारांची प्रचिती येती ती- जेव्हा महाराष्ट्र सरकार अंधश्रद्धा निर्मुलन कायदा लागु करणार होते. तेव्हा महाराजांनी वैक्तीक लक्ष घालुन त्यातील त्रुटी दूर केल्या व कायदा अजून भक्कम केला.
भैय्युजी महाराज पर्यावरण स्नेही होते. जलशिवाराची कामे ते स्वतः हाती घेऊन ते पूर्णत्वास नेत, बीड मधील जलशिवाराच्या कामात त्यांचा मोठा वाटा होता. मध्य प्रदेशातील आदिवासी भागात त्यांनी 5000 तलाव बांधुन शेतकऱ्यांची अडचण दूर केली.
भैय्युजी महाराज पुष्प-गुच्छ,शाल,हार कधीच स्वीकारत नव्हते. ते लोकांना दक्षिणा देण्याऐवजी झाड लावण्यास सांगत होते. त्यांच्या या कल्पनेतुन 18 लाख झाडे लावल्या गेली.
भैय्युजी महाराजांनी एड्सग्रस्त मुलांसाठी अकोल्यात महाराष्ट्रातील पहिले आश्रम स्थापन केले. आजही ह्या आश्रमात 51 मुल-मुली आहेत.
कोपर्डीतील श्रद्धाच्या शाळेत त्यांनी तीन बसेस भेट दिल्या व शाळा डिजिटल करण्यासाठी त्यांनी फडवणीसांसोबत भेट ही घेतली. त्यांच हे स्वप्न मात्र अपुर्ण राहिले.
भैय्युजी महाराजांच्या आत्महत्येनंतर त्यांच्या विरोधातील अनेक पोस्ट वाचल्या त्यामुळे त्यांच्या सामाजिक कार्याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे सोशल मिडियावरुन व्यक्त होण्याच्या स्वातंत्र्याचा गैरफायदा आपण घेत आहोत का याचा विचार केला पाहिजे.
प्रतिष्ठित व्यक्तींनी आत्महत्या केली की कोणालाच फरक पडत नसतो. फक्त सोशल मीडिया व मीडियावर चर्चेचा विषय मिळतो. मी त्यांच्या किती जवळचा होतो. हे सांगण्याचा प्रयत्न प्रत्येकजण करतो.
ते कसे होते हे सांगण्यापेक्षा त्यांना कोणत्या प्रकारात समोर दाखवायचा याचा प्रयत्न ही मंडळी करतात. खर खोट करायला ते नसल्याचा पुरेपुर फायदा ही लोक घेतात.
भैय्युजी महाराजांनी आत्महत्या का केली ? यापेक्षा त्यांची शिकवण काय होती ? याचा विचार आपण केला पाहिजे.

                  ✍ रजत देशमुख

Comments

Popular posts from this blog

इच्छाशक्तीचा सम्राट

साहित्यिक शंभूराजे

सदमा