सदमा

श्रीदेवी यांना "अभिनयाची देवी" हे नाव उत्तमरीत्या शोभल असते. आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना वेड लावुन सरतेशेवटी बॉलीवूडच्या देवी ठरल्या....
दक्षिण भारतातील काशी म्हणुन ओळखलं जाणाऱ्या शिवकाशी येथे 1963 साली श्रीदेवींचा जन्म झाला.
वयाच्या 4 थ्या वर्षांपासून श्रीदेवींनी चित्रपटात बाल कलाकार म्हणुन काम सुरू केले. 
मल्याळम, तेलगु, तामिळ, हिंदी अशा विविध भाषेतील 300 चित्रपटात काम करण्याचं भाग्य श्रीदेवींना लाभलं. भाग्यापेक्षा त्यांच्यात असलेल्या उत्तम कलाकाराने त्यांना एवढ्या मोठ्या उंचीवर नेल.
1979 साली सोलावा सावन चित्रपटातुन बॉलीवूड मध्ये पदार्पण केले. सौंदर्याची खान, उत्तम अभिनय व 80 च्या दशकात कोणी विचारही केला नसेल अस नृत्य ह्या श्रीदेवींच्या भक्कम बाजु त्यामुळे त्या बॉलीवूडच्या पहिल्या महिला सुपरस्टार झाल्या.
हिंदी भाषेवर पक्कड नसल्या मुळे सुरुवातीला हिंदी चित्रपटात त्यांचा आवाज नाज ह्या डब करत असे.
आखरी रास्ता या चित्रपटात तर रेखा यांनी त्यांना आवाज दिला. हिंदी भाषा बोलता न येणे ही त्यांची ऋणात्मक बाजु करीयर मध्ये आडवी आली असती पण त्यांनी हिंदी भाषा शिकुन चांदनी ह्या चित्रपटात  स्वतः संवाद डब केले. फक्त संवाद डब करून त्या थांबल्या नाहीत तर त्यांनी त्यात एक गाणं सुद्धा गायलं. स्वतःची कमतरता त्यांनी उत्तमरीत्या भरून काढली.
1983 मधील हिम्मतवाला या चित्रपटाची बातच न्यारी या चित्रपटाने बॉलीवूड ची नजर बदलुन टाकली. याच चित्रपटातील नैन्नो मै सपना गीताने पुर्ण भारताला वेड लावले यातील श्रीदेवींच नृत्य जीतेंद्रजींना लाजवेल अस होत. त्यामुळेच ते पुढच्या पिढीच्या ओठावर देखील राहील.
80-90 या दशकात श्रीदेवी यांनी बॉलीवूड मध्ये क्रांती आणली कारण अभिनेतीला डोळ्यासमोर ठेऊन चित्रपट निर्माण करायला श्रीदेवी यांनी भाग पाडलं. शेरणी, आर्मी ही चित्रपटे श्रीदेवी यांना डोळ्यासमोर ठेऊन लिहिली गेली.
आज पर्यंत कोण्या नायिकेला डबल रोल देण्याच धाडस बॉलीवूड करत नाही. पण श्रीदेवी याला अपवाद आहेत कारण चालबाज व लमहे या चित्रपटात त्यांनी डबल रोल साकारला....5 सर्वोत्कृष्ट अभिनेतीचे फिल्मफेअर अवॉर्ड श्रीदेवी यांच्या नावावर आहेत...श्रीदेवी या पद्मश्री पुरस्कार लाभलेल्या पहिल्या महिला अभिनेत्री आहेत...
श्रीदेवींचे चाहते कसे राहिले असतील याच उदाहरण माझ्या घरातच आहे....माझी आई वडील दोघे श्रीदेवी यांचे चाहते माझ्या मोठ्या भावाच्या जन्मापुर्वी चांदनी हा चित्रपट रिलीज झाला  तेव्हाच माझ्या आईने ठरवल की मला मुलगीच होईल आणि तीच नाव मी चांदनी ठेवील पण मुलगा जन्माला आला. माझ्या आईच्या मनात ही खंत राहिली. पण तीने त्या चित्रपटातील अभिनेत्याच रोहित हे नाव माझ्या भावाला देऊन ही खंत भरून काढली.
ही गोष्ट मला माझ्या आईने सांगितल्या नंतर चांदनी हा चित्रपट T.V वर लागल्यास मी तो कधीच सोडला नाही.त्यामुळे हा चित्रपट माझ्या हृदयाजवळचा राहिला.
चालबाज या चित्रपटातील किसी के हात ना आयेगी ये लडकी हे गाणं श्रीदेवी यांच्या आयुष्याला पुरेपूर लागु होते.
हिम्मतवाला मधील रेखा, तोहफा मधील ललिता, मकसद मधील भारती, मी.इंडिया मधील सोनी, लम्हे मधील पल्लवी, चांदनी मधील चांदनी, जुदाई मधील काजल आणि मॉम मधील देवकी हे पात्र मी कधीच विसरू शकत नाही....
भविष्यात जान्हवी आणि खुशी ही आपली उणीव भरून काढतील अशी आशा ठेवतो...
बॉलीवूडला लाभलेल्या या महान अभिनेत्रीस कोटी कोटी अभिवादन..

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

विजयाचा शिल्पकार

इच्छाशक्तीचा सम्राट