इच्छाशक्तीचा सम्राट
गॅलिलिओ,आईन्स्टाइन,स्टीफन हॉकिंग ह्यांच्यात काही साम्य आहेत. तिघांची बौद्धीकक्षमता अफाट, का ? हा प्रश्न तिघांना आयुष्यभर पडला, दैववाद तिघांनी नाकारला, (ज्यांनी-ज्यांनी दैववाद मानला त्यांना का ? हा प्रश्न पडत नाही कारण एकदा का दैववाद मानला की सृष्टीतील गुढांचे उत्तर दैव हेच येते.) तिघातही प्रबळ इच्छाशक्ती होती पण स्टीफन हॉकिंग यांच्यात थोडी जास्तच होती.
स्टीफन हॉकिंग यांना वयाच्या एकविसाव्या वर्षी मोटर न्युरॉन या रोगाने ग्रासले या रोगात रोगीच्या शरीरातील अवयव हळूहळू निकामी होत जातात. व शेवटी रोगीचा मृत्यू होतो. डॉक्टरांनी केवळ 2-3 वर्षांचा कालावधी दिला.
कृष्णविवर (Blackholes) याचा देखील मृत्यू होईल असा सिद्धांत स्टीफन हॉकिंग यांनी मांडला. मुळात त्यांनी मृत्यू हा सिद्धांतच स्वीकारला होता. म्हणजे रोगात त्यांचा मृत्यू होईल हे त्यांनी मान्य केल असेल पण तो इतक्या लवकर होईल हे त्यांनी धुडकावून लावल असेल.
शरीर कमकुवत होत असताना स्वतःवरची विज्ञाननिष्ठा त्यांनी कधीच कमकुवत केली नाही. याच्याच जोरावर 2-3 वर्ष जगायचे तर ते जास्तीचे 50 वर्ष जगले. हे सहज कोणाला जमत नसते. यात स्वतःच अस्तित्व विसरावे लागते, भावनांना आवर घालावा लागतो व कल्पनाशक्तीचा जोर वाढवावा लागतो.
साधा सर्दी,ताप झाला तर सामान्य माणूस 5-6 दिवस आराम घेतो. कामाच्या तासात आराम करून स्वतःचा वेळ वाया घालतो. मात्र ह्या रोगाशी झुंज देताना स्टीफन हॉकिंग यांनी आपला वेळ वाया घातला नाही.
एखाद्याला मोटर न्युरॉन रोगाने वेढा घातला आहे ही बातमी समजली असती तर तो खचुन गेला असता. मात्र स्टीफन हॉकिंग यांच्या शरीराला मोटर न्युरॉन रोगाने कमकुवत केले.तिथूनच त्यांनी संशोधनाला सुरुवात केली. आणि हाच फरक सामान्य आणि असामान्यात असतो.
वीज्ञान क्षेत्रातील लोकांना स्टीफन हॉकिंग यांच कुतूहल तर होतंच पण त्यापेक्षा कितीतरी अधिक वीज्ञान क्षेत्राबाहेरील लोकांना होत.
कृष्णविवरे, त्यातील किरणोत्सर्ग, पृथ्वीच्या उत्पत्तीचा शोध स्टीफन हॉकिंग घेत राहिले व यात ते सिद्धांत मांडत राहिले. पण यापेक्षा एक वेगळा सिद्धांत त्यांनी लिहून वा बोलुन मांडला नाही मात्र स्वतःच्या आयुष्यातून मांडला तो म्हणजे -
आयुष्यात काही स्वप्ने बघितली आणि ती साध्य करण्यासाठी काही अडचणी आल्या तरी काही हारकत नाही कारण जगातील कोणतीच ताकद तुम्हाला तुमच्या स्वप्नांपासुन अडवून ठेऊ शकत नाही.
हा सिद्धांत जेव्हा जनमाणसात स्वीकारला जाईल तीच खरी स्टीफन हॉकिंग यांना श्रद्धांजली राहील.
- रजत देशमुख

Comments
Post a Comment