Posts

Showing posts from March, 2018

पवार, पॉवर आणि पॉलिटिक्स

Image
सोनिया गांधी यांनी दिल्लीत प्रीती भोजनाचा कार्यक्रम घेतला. यात शरद पवार सक्रिय दिसले. लगेच दुसऱ्या दिवशी राहुल गांधी यांनी शरद पवारांची भेट घेतली. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले. सोनिया गांधी यांनी शरद पवारांना काँग्रेसची ऑफर दिली. अश्या बातम्या प्रसारमाध्यमावर प्रसारित व्हायला सुरुवात झाली. सोनिया गांधी यांनी शरद पवारांना कोणती ऑफर दिली ? काँग्रेसची की पंतप्रधानपदाची ? शरद पवार आपली राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी काँग्रेसमध्ये विलीन करतील हे तर काही शक्य नाही. 1999 ते 2014 पर्यंत सत्तेत राहिलेला पक्ष कोण स्वतः संपवेल. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत शरद पवारांची एकाधिकारशाही आहे. म्हणुन पवार काँग्रेस मध्ये जाणे ही फक्त बातमीच राहील यात काही तथ्य नाही. मात्र शरद पवारांना पंतप्रधानपदाची ऑफर दिली जाईल का ? ही बातमी महत्त्वाची आहे. ही बातमी सत्यात उतरू शकेल. कारण मोदी, शाह या झंझावाताला थांबवण्यासाठी त्यांच्या तोडीचाच चाणक्य लागेल. हे आता सर्वांना कळुन चुकले. सोनिया गांधी यांनी 20 पक्षांना एकत्र आण्याचे काम केले. या 20 पक्षांना बांधुन ठेवणाऱ्या नेत्याची गरज आता आहे.  राहुल गा

इच्छाशक्तीचा सम्राट

Image
"स्टीफन हॉकिंग" संपुर्ण जगाला ज्ञात असलेले नाव, त्यांच्या सिद्धांताचा गंध नसलेल्या सुद्धा हे नाव ओळखीचे वाटते....जगाने शास्त्रज्ञाच्या पलीकडे स्टीफन हॉकिंगडे पाहिले. हे भाग्य फार कमी जनांच्या नशिबाला येते. वैज्ञानिक गॅलिलिओ यांच्या 300व्या पुण्यतीथीदिनी स्टीफन हॉकिंग यांचा जन्म झाला व आईन्स्टाइन यांच्या जन्मदिवशी स्टीफन हॉकिंग यांचा मृत्यु झाला. हा योगायोगच म्हणावे लागेल कारण ज्याने आपल्या ह्यातीत दैववाद नाकारला त्याच्या माथी चमत्कार मारणे म्हणजे त्याचा अपमानच करणे. गॅलिलिओ,आईन्स्टाइन,स्टीफन हॉकिंग ह्यांच्यात काही साम्य आहेत. तिघांची बौद्धीकक्षमता अफाट, का ? हा प्रश्न तिघांना आयुष्यभर पडला, दैववाद तिघांनी नाकारला, (ज्यांनी-ज्यांनी दैववाद मानला त्यांना का ? हा प्रश्न पडत नाही कारण एकदा का दैववाद मानला की सृष्टीतील गुढांचे उत्तर दैव हेच येते.) तिघातही प्रबळ इच्छाशक्ती होती पण स्टीफन हॉकिंग यांच्यात थोडी जास्तच होती.  स्टीफन हॉकिंग यांना वयाच्या एकविसाव्या वर्षी मोटर न्युरॉन या रोगाने ग्रासले या रोगात रोगीच्या शरीरातील अवयव हळूहळू निकामी होत जातात. व शेवटी रोगीचा मृत्यू होत

विजयाचा शिल्पकार

Image
त्रिपुरा विधानसभेचा आज निकाल आला आणि त्याने सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला. 2017 पर्यंत त्रिपुरा या राज्यात भारतीय जनता पार्टीचा एकही कार्यकर्ता नव्हता आज तिथेच 43 जागा मिळवुन पक्षाचा मुख्यमंत्री होतो, खरच ही गोष्ट आचंबीत करणारी आहे. ज्या पक्षाला राज्यातील प्रदेशाध्यक्ष पद बदलण्याचे महत्त्व वाटत नव्हते त्या राज्यात एवढे घवघवीत यश आज पक्षाने मिळवले. ही निवडणूक जिंकण्यासाठी भाजपच्या अनेक नेत्यांनी मेहनत घेतली. कोणताही चेहरा समोर न ठेवता भाजपाने ही निवडणुक लढवली. या विजयामाग मात्र एका व्यक्तीचा मोलाचा वाटा आहे आणि तो म्हणजे विप्लव कुमार देव यांचा... हे नाव आपल्यासर्वांसाठी नवखे आहे त्यापेक्षा 2016 आधी त्रिपुरा राज्यालासुद्धा हे नाव नवेच होते. भारतीय जनता पार्टीचे त्रिपुरा राज्यातील पाहिले मुख्यमंत्री म्हणुन विप्लव देव यांना संधी देण्यात येईल अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. बनमालिपुर विधानसभा मतदारसंघातून त्यांनी निवडणुक लढवली आहे. विप्लव देव हे कोण्या राजकीय घराण्याशी संबंधित नाहीत किंवा 2016 आधी ते राजकारणात सक्रिय देखील नव्हते. त्यांचे त्रिपुरा राज्यात देखील जास्त वास्तव नाही. त्