कृष्णाकांठ की लोक माझे सांगती
कृष्णाकांठ
यशवंतराव चव्हाण यांना दिल्लीवरून बोलवण आलं...तेव्हा महाराष्ट्रातील लोकांनी दिल्लीच्या मदतीला सह्याद्री धावुन गेला अशी गर्जना केली…..यशवंतरावांसारख्या सात्विक माणसाची किंमत दिल्लीला कुठे होती. दिल्लीतील मंडळींनी यशवंतरावांना योग्य तो न्याय दिला नाही. फक्त स्वतःच्या स्वार्थाकरिता यशवंतरावांचा उपयोग करून घेतला.
"गरजेपुरते यशवंतराव" ही दिल्लीकरांची समज होती.
संरक्षण मंत्री ते गृह मंत्री पुन्हा अर्थ मंत्री पुन्हा पराष्ट्र मंत्री व शेवटी फक्त नियोजन आयोगाचे अध्यक्ष असा अपमानीत प्रवास केवळ यशवंतरावांचाच असेल....!!
जेव्हा शास्त्रीजींचे निधन झाले तेव्हा पंतप्रधान होण्याची इच्छा यशवंतरावांची होती..आणि तेवढी त्यांची क्षमता होती आणि त्यांना तेवढा पाठिंबा सुद्धा राहिला असता.... केवळ पंडीत नेहरूंच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी त्यांनी इंदिराजींना पाठिंबा दिला. इंदिराजींनी मात्र यशवंतरावांच्या ऋणाची जाण ठेवुन योग्य न्याय दिला अस मला वाटत नाही...!!
ह्या दिल्लीची एक सवय आहे...हे जेव्हा अडचणीत असतील तेव्हाच हे दिल्लीचे दारे महाराष्ट्रासाठी उघडी करतात आणि स्वार्थ साधुन घेतला की पुन्हा ती दारे बंद करून घेतात...
ह्यांना महाराष्ट्राच्या राजकारणात फार रुची आहे...महाराष्ट्रातील सर्व सूत्रे दिल्लीतुनच हालावी अशी यांची इच्छा असते मात्र महाराष्ट्राने दिल्लीत लक्ष घालु नये व प्रत्येक संधी पासुन महाराष्ट्राला वंचीत ठेवण्याचा ह्यांचा प्रयत्न असतो..!!
लोक माझे सांगती
आता मात्र 2019 मध्ये महाराष्ट्रातील वाघाने (पवार साहेबांनी) दिल्लीची सूत्रे हातात घेऊन ह्या प्रथेला कुठेतरी गतिरोधक लावावा...
दिल्लीकरांना कस अडचणीत आणायचं याच तंत्र साहेबांना अवगत आहे...याचं तंत्राचा वापर करून दिल्लीकरांची गोची करण्याची कला देखील साहेबांना अचुक माहीत आहे.
दिल्ली विरुद्ध बंड करून स्वतःच अस्तित्व निर्माण करण्याची शक्ती फक्त #पवार साहेबांकडेच आहे.
#सह्याद्रीचे वारे
#सह्याद्रीतील_दोन_वाघ
Comments
Post a Comment