श्रीशंभुराज्यभिषेक

श्रीशंभुराज्याभिषेक घडामोडी
शके १६०२ रौद्र संवत्सरे श्रावण शुद्ध पंचमी (नागपंचमी) म्हणजेच २० जुलै १६८० रोजी संभाजी महाराजांचे मंचकारोहण झाले आणि त्यांनी स्वतःला “राजा” झाल्याचे घोषित केले. यासंदर्भात डाग रजिस्टर मध्ये २४ ऑगस्ट १६८० ची नोंद आहे –
“जुन-जुलै शिवाजीराजा मरून संभाजीला त्याचे सिंहासन मिळाले असावे असे सर्वत्र बोलले जाते. आपल्या बापाच्या तत्त्वांप्रमाणे संभाजी वागणारा आहे असे लोक म्हणतात.”
संभाजी महाराजांचा कारभार रायगडावरुन सुरळीत सुरु झाला. त्यांनी आगळीक करणाऱ्या सर्व मंत्र्यांना माफ करुन पुन्हा त्यांच्या पदावर पुन्हा नियुक्त केले. मोरोपंत पिंगळेंच्या निधनानंतर त्यांच्या पुत्राला पेशवाई दिली गेली.
श्रीशंभुराज्याभिषेक सोहळा
थोरल्या महाराजांच्या मृत्युनंतरच्या अस्थिर वातावरणात झालेल्या मंचकरोहणात शंभुराजे व त्यांच्या सहकारी मंत्र्याधिकाऱ्यांना त्यातुन तितके समाधान व शास्त्रार्थाच्या दृष्टीने निर्दोषत्व वाटले नाही. त्यामुळे शंभुराजांवर विधियुक्त राज्याभिषेक करवुन राजसिंहासानाची प्रतिष्ठा राखावी असा विचार झाला. त्यानुसार शंभुराजांनी आपला राज्याभिषेक करण्याचा निर्णय घेतला.
१४, १५ व १६ जानेवारी १६८१ (रौद्रनाम संवत्सरातील माघ शुद्ध ७, शके १६०२) यादिवशी शंभुराजांचा विधियुक्त राज्याभिषेक झाला व ते स्वराज्याचे दुसरे छत्रपती झाले.
राज्याभिषेक प्रसंगी पुर्वीच्या कैद्यांना मुक्त करण्याचा रिवाज असल्याने शंभुराजांनी कैद्यांना मुक्त केले. प्रधान मंडळातील अण्णाजी दत्तो, निळोपंत, बाळाजी आवजी, जनार्धनपंत आदींच्या समावेशाने प्रधान मंडळ नेमुन त्यांना कारभार सांगितला गेला.
संभाजी राजांच्या प्रधान मंडळाची रचना –
सिंहासनाधीश्वर श्रीमंत छत्रपती – संभाजीराजे शिवाजीराजे भोसले (सेनाधीशांचे सेनाधीश – सर्वोच्च अधिकार असलेले )
श्री सखी राज्ञी जयति – छत्रपती येसुबाई संभाजीराजे भोसले (संभाजीराजांच्या गैरहजेरीत राजव्यवस्थेच्या कारभारी)
सरसेनापती – हंबीरराव मोहिते
कुलएख्तीयार (सर्वोच्च प्रधान) – कवी कलश
पेशवे – निळो मोरेश्वर पिंगळे
मुख्य न्यायाधीश – प्रल्हाद निराजी
दानाध्यक्ष – मोरेश्वर पंडितराव
चिटणीस – बाळाजी आवजी
सुरनीस – आबाजी सोनदेव
डबीर – जनार्दनपंत
मुजुमदार – अण्णाजी दत्तो
वाकेनवीस – दत्ताजीपंत
संकलन – शिवपुत्र शंभुराजे राज्याभिषेक ट्रस्ट, पुणे.

Comments

Popular posts from this blog

सदमा

विजयाचा शिल्पकार

इच्छाशक्तीचा सम्राट