विरोधकांचा अज्ञाज्ञी विरोध
पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी आपुल्या घरीच हाल सोसते मराठी हे असे कितीक खेळ पाहते मराठी शेवटी मदांध तख्त फोडते मराठी ही चार वाक्य मराठी भाषा दिनी चर्चित आली...याच कारण म्हणजे मराठी भाषा दिनी विधिमंडळाच्या आवारात सामुहिक मराठी अभिमाणगीत (लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी) गायनाचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमात मराठी अभिमान गीतातील ह्या चार ओळी गाळण्यात आल्या. यावरुन विरोधकांनी सभागृहात सरकारवर आक्षेप घेत गोंधळ घातला. सरकारनेही माईक खराब झाला सांगत सारवासारव केली. आता मराठी अभिमानगीतात या ओळी न घेण्याचं कारण समजावून घेण्याकरता या कवितेचा इतिहास तपासणं आवश्यक आहे. सुरेश भटांनी ही कविता संयुक्त महाराष्ट्र लढ्यादरम्यान लिहिली त्यावेळी त्यांनी ह्या ओळी त्यात लिहिल्या नाहीत. पुढे ही कविता रुपगंधा या त्यांच्या संग्रहात प्रसिद्ध झाली. या संग्रहात देखील शेवटच्या चार ओळी टाकल्या नाहीत. 1980 दरम्यान बाळासाहेब ठाकरेंच्या सभेत सुरेश भटांनी ही कविता सादर केली व ह्या चार ओळी शेवटी त्यात जोडल्या पण त्यांनी ह्या ओळी रुपगंधा संग्रहातील पुढील आवृत्तीत टाकल्या नाहीत. आज जरी आपण हा संग्रह उघडुन पाहि...