विरोधकांचा अज्ञाज्ञी विरोध

पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी
आपुल्या घरीच हाल सोसते मराठी
हे असे कितीक खेळ पाहते मराठी
शेवटी मदांध तख्त फोडते मराठी
ही चार वाक्य मराठी भाषा दिनी चर्चित आली...याच कारण म्हणजे मराठी भाषा दिनी विधिमंडळाच्या आवारात सामुहिक मराठी अभिमाणगीत (लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी) गायनाचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमात मराठी अभिमान गीतातील ह्या चार ओळी गाळण्यात आल्या. यावरुन विरोधकांनी सभागृहात सरकारवर आक्षेप घेत गोंधळ घातला. सरकारनेही माईक खराब झाला सांगत सारवासारव केली.
आता मराठी अभिमानगीतात या ओळी न घेण्याचं कारण समजावून घेण्याकरता या कवितेचा इतिहास तपासणं आवश्यक आहे.
सुरेश भटांनी ही कविता संयुक्त महाराष्ट्र लढ्यादरम्यान लिहिली त्यावेळी त्यांनी ह्या ओळी त्यात लिहिल्या नाहीत. पुढे ही कविता रुपगंधा या त्यांच्या संग्रहात प्रसिद्ध झाली. या संग्रहात देखील शेवटच्या चार ओळी टाकल्या नाहीत.
1980 दरम्यान बाळासाहेब ठाकरेंच्या सभेत सुरेश भटांनी ही कविता सादर केली व ह्या चार ओळी शेवटी त्यात जोडल्या पण त्यांनी ह्या ओळी रुपगंधा संग्रहातील पुढील आवृत्तीत टाकल्या नाहीत. आज जरी आपण हा संग्रह उघडुन पाहिला तर त्यात या ओळींचा उल्लेख नाही.
त्यांनी जाणून बुजून या ओळींचा उल्लेख केला नाही.
याचे कारण असे की मराठीवर आलेली ही सध्यस्थीती आहे ती काय चिरंतर राहणारी नाही....आणि ही परिस्थिती आपल्या प्रयत्नांनी काही दिवसात बदलेलंच असा सगळ्यांनाच विश्वास आहे.
एक सोपं उदाहरण घ्यायचं झालं तर जण गण मन किंवा वंदे मातरम ही गीत ज्यावेळी लिहिली गेली त्यावेळी देशात गरिबी होती म्हणुन त्याचा उल्लेख केला गेला पाहिजे होता का ? किंवा आज देशात भ्रष्टाचार आहे म्हणुन हा उल्लेख त्यात असला पाहिजे का ?
कारण ही परिस्थिती नेहमीसाठी राहणार नाही ती आज ना उद्या बदलणार आहे.
तसच या अभिमान गीताचे देखील आहे. ह्यातील ह्या चार ओळी निरंतर नाहीतच मग त्यांचा उल्लेख करण्याची गरज कशाला लागते. त्या लक्षात ठेवाव्या लागतील अभिमानाने गाण्यासाठी नाहीतर ही परिस्थीती बदलण्यासाठी....
अभिमान गीतात अपमानजनक ओळी कशासाठी...एवढ्या शुभदिनी अभिमानाने अभिमानगीत गायचं का उदासीनतेने अपमानगीत गायचं याचा विचार केला गेला पाहिजे.
विरोधकांजवळ विरोध करण्यासाठी प्रभावी मुद्दे राहिले नाही त्यामुळे ते असले मुद्दे घेऊन सभागृहात गोंधळ घालत आहेत. पण या मुळे नागरिकांना बरोबर पण चुक वाटत आहे व त्यांच्यात संभ्रम निर्माण होत आहे. 
आता आपण देखील कुठे विरोध व कुठे समर्थन करायच हे शिकलं पाहिजे.
नाहीतर विरोधक असतातच सरकारच्या प्रत्येक गोष्टीला विरोध करण्यासाठी कारण विरोधकाचा धर्मच आहे विरोध करणे. आपण मात्र सावधगिरीने विरोध वा समर्थन केले पाहिजे.

Comments

Popular posts from this blog

इच्छाशक्तीचा सम्राट

साहित्यिक शंभूराजे

सदमा