मग दुःख कशाचे

"दुःख" मानवी जीवनाचा अविभाज्य भाग...ज्या शिवाय जीवन कधीही पुर्ण होऊ शकत नाही. वय,स्थळ,पैसा,बुद्धी कशाचाही भेद न करता हे प्रत्येक मानवी जीवनात येणार...फक्त याचे प्रकार वेगवेगळे असणार.
मग दुःख कशाचे ?
त्याला भेटलं मला नाही, त्याच झालं माझं नाही या प्रकारचे दुःख मात्र दुःख नसते ही असती मानवी जीवन अस्त करण्याची प्रक्रीया ही प्रक्रिया मनुष्याला आयुष्यात कधीच उभं राहु देत नाही त्यामुळे ही दुःखाच्या बाहेरची प्रक्रिया.
कारण दुःख आले की ते काही काळाने जाणारच किंवा आपण ते लढण्या समर्थ झालो की त्याचा आघात कमी होणारच यात काही शंका नाही. सुःख दुःख ही निरंतर चालणारी प्रक्रिया नसुन ते एक चक्र आहे त्यामुळे ते फिरतच राहणार पण ईर्ष्या हा बिंदु आहे तो स्तब्ध राहणार आणि तो रेघ संपवणार त्यामुळे ईर्ष्या आली की मानवी जीवनाचा शेवट होणार....
ईर्ष्य्चा रुपांतर होत ते "द्वेष"आत आणि आपापसातील आपुलकी संपवण्यास हा घटक पुरेसा आहे.
स्वकीयाने काही करुन दाखवले तर त्याची प्रेरणा घेऊन पुढे गेले तर त्यापेक्षा उत्तम काम आपल्या हातुन होण्याची खात्री असते. कारण त्याच्या हातुन झालेल्या चुका टाळन्याची संधी आपल्याला प्राप्त होत असते व यापासुन आपला स्वकीय मुकलेला असतो.
मानवी स्वभाव मात्र त्याच्या प्रगतीपासून स्वतःच आयुष्य उभं करण्यासाठी ऊर्जा खर्च न करता त्याच्या प्रगतीला आपलं दुःख समजुन आपली ऊर्जा वाया घालतो.
त्याच्या नशीबी कस काय ? मी कम नशीबी, असल्या निरर्थक गोष्टीकडे लक्ष केंद्रीत करुन स्वतःची ताकद विसरून जातो व आजुन दुःखी होतो आणि यालाच दुःख समजतो. आणि हे दुःख कोण्या प्रसंगाने न येता स्वनिर्मीत असते आणि त्यामुळे यातुन बाहेर पडण्याचा उपाय सुद्धा स्वतःकडे असतो पण त्याचा शोध हा दुसरीकडेच कुठे तरी शोधत असतो.
मुळात तर हे "दुःख" नसतेच ही एक भावना असते....
आणि ज्यांनी ज्यांनी ह्यावर आवर घातला तेच आयुष्यात सुखी झालेले आहेत.

सुखी जीवनाचा एक मुलमंत्र आहे....
             ‎ना कुणाची ईर्ष्या
             ‎ना कुणाशी स्पर्धा
             ‎माझे एकट्याचे ध्येय
             ‎माझ्या एकट्याचा रस्ता

           - रजत देशमुख

Comments

Popular posts from this blog

सदमा

विजयाचा शिल्पकार

इच्छाशक्तीचा सम्राट