पवार, पॉवर आणि पॉलिटिक्स
सोनिया गांधी यांनी दिल्लीत प्रीती भोजनाचा कार्यक्रम घेतला. यात शरद पवार सक्रिय दिसले. लगेच दुसऱ्या दिवशी राहुल गांधी यांनी शरद पवारांची भेट घेतली. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले. सोनिया गांधी यांनी शरद पवारांना काँग्रेसची ऑफर दिली. अश्या बातम्या प्रसारमाध्यमावर प्रसारित व्हायला सुरुवात झाली. सोनिया गांधी यांनी शरद पवारांना कोणती ऑफर दिली ? काँग्रेसची की पंतप्रधानपदाची ? शरद पवार आपली राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी काँग्रेसमध्ये विलीन करतील हे तर काही शक्य नाही. 1999 ते 2014 पर्यंत सत्तेत राहिलेला पक्ष कोण स्वतः संपवेल. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत शरद पवारांची एकाधिकारशाही आहे. म्हणुन पवार काँग्रेस मध्ये जाणे ही फक्त बातमीच राहील यात काही तथ्य नाही. मात्र शरद पवारांना पंतप्रधानपदाची ऑफर दिली जाईल का ? ही बातमी महत्त्वाची आहे. ही बातमी सत्यात उतरू शकेल. कारण मोदी, शाह या झंझावाताला थांबवण्यासाठी त्यांच्या तोडीचाच चाणक्य लागेल. हे आता सर्वांना कळुन चुकले. सोनिया गांधी यांनी 20 पक्षांना एकत्र आण्याचे काम केले. या 20 पक्षांना बांधुन ठेवणाऱ्या नेत्याची गरज आता आहे. राहु...